मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT vs MI) सामन्यात मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसला. त्याचे अर्धशतक ७ धावांनी हुकले. पण इशान किशनसोबत त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने २८ चेंडूत ४३ धावा केल्या. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकात त्यांनी एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या. या खेळीदरम्यान रोहितने एक स्कूप षटकार ठोकला. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माची फलंदाजी पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही आनंदाने उडी मारली. रणवीर त्याच्या आवडत्या फलंदाजाला प्रोत्साहन देताना दिसला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रणवीर सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा खूप मोठा चाहता आहे आणि अनेकदा सामने पाहण्यासाठी स्टेडियमला भेट देतो.
Just WOW , Rohit 🔥🔥 pic.twitter.com/6OvQVmmSRs
— [email protected] (@Arnav904) May 6, 2022
असा रंगला सामना…
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने ४५ धावा केल्या. टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ४३ धावांची खेळी खेळली. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हार्दिक पंड्याचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ५ गडी गमावून १७२ धावाच करू शकला. शेवटच्या षटकात त्यांना ९ धावांची गरज होती, पण मुंबईकडून डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातकडून वृद्धिमान साहाने ५५, शुबमन गिलने ५२ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने २४ धावा केल्या. मुंबईकडून मुरुगन अश्विनने दोन बळी घेतले
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com