मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये काल सायंकाळी (६ मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या हंगामाच्या ५१व्या सामन्यात मुंबईने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यानंतर गुणतालिकेत (IPL 2022 Points Table) कोणताही बदल झाला नाही. गुजरात टायटन्स सामना गमावूनही आयपीएल २०२२च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या संघाचे ११ सामन्यांत ८ विजयासह १६ गुण आहेत. गुजरातचा संघ प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. गुजरातसोबतच लखनऊ, राजस्थान आणि बंगळुरू या संघांचा टॉप-४मध्ये समावेश आहे. या हंगामात लखनऊने ७सामने जिंकले आहेत, तर राजस्थान आणि बंगळुरूने प्रत्येकी ६-६ सामने जिंकले.
आयपीएलमधील आत्तापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यावर्षीच्या हंगामात मात्र गुणतालिकेत तळाशी जाऊन बसले. चेन्नईचे १० सामन्यांत ३ विजय आणि ७ पराभवांसह ६ गुण आहेत, तर मुंबईचे १० सामन्यांत २ विजय व ८ पराभवांसह ४ गुण आहेत. या दोन्ही संघांनी प्लेऑफ गाठण्याची संधी जवळपास गमावली आहे.
A look at the Points Table after Match No. 5⃣1⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #GTvMI pic.twitter.com/QCCN9Lm30Y
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
आजची लढत…
आज दुपारी ३.३० वाजता राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ५२वा सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान संघ चांगल्या लयीत असून, प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्यात विजय मिळवून पंजाब संघाचा गुणतालिकेत टॉप-४मध्ये जाण्याच्या उद्देश असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IAS पूजा सिंघल ईडीच्या कचाट्यात; तब्बल १९ कोटींची रक्कम जप्त
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com