IPL 2022 Final : “मिस्टर पंड्या, आता कसं वाटतंय?”, ट्रॉफी जिंकल्यानंतर कोच नेहराचा हार्दिकला मजेशीर सवाल! पाहा VIDEO

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. विजेतेपदामुळे हार्दिक आनंदी आहे. हार्दिक आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता. या अविस्मरणीय विजयानंतर गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने हार्दिकला एक प्रश्न विचारला.

नेहराने हार्दिकला विचारले, ”मिस्टर पंड्या कशी फिलिंग आहे?” या प्रश्नाचे उत्र देताना पंड्या म्हणाला, ”खूप चांगले, पहिल्या वर्षीच षटकार मारला. चॅम्पियन होण्यापेक्षा मोठे काय असू शकते? लोक फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल बोलत होते, पण आता चॅम्पियन झालोय तर ठीक आहे.” आयपीएलच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –