IPL 2022 CSK vs MI : इतकी मोठी स्पर्धा आणि इज्जत घालवली..! वानखेडेवर चेन्नईचा घात; काय झालं वाचा!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात लढत रंगत आहे. या सामन्यात वानखेडे मैदानावर वीजटंचाई निर्माण झाली आणि त्याचा फटका चेन्नई संघाला बसला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली यांना शून्यावर बाद केले. वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कॉनवे पायचीत झाला आणि त्याला खातेही खोलता आले नाही. पंचांनी कॉनवेला बाद ठरवले, पण चेंडू यष्ट्यांना लागत नसल्याचे समजले. तांत्रिक समस्येमुळे कॉनवेला डीआरएसही घेता आला नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले. ही समस्या विजेशी संबंधित होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पालाही पायचीत पकडले आणि त्यालाही डीआरएस घेता आला नाही. या घटनेमुळे वानखेडे स्टेडियमच्या व्यवस्थापनाला दोष दिला जात आहे.

 

कॉनवेचा डीआरएस अंपायरने फेटाळला तेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही अंपायरशी संवाद साधला. अंपायरने सांगितले, की फलंदाज यावेळी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. कॉनवे लवकर बाद झाल्याने चेन्नईला मोठा धक्का बसला. कॉनवे सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कॉनवेने लग्नानंतर संघात परतल्यानंतर सलग तीन अर्धशतके झळकावली होती.

चेन्नईचा डाव

मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने धमाकेदार स्पेलसह सुरुवात केली आणि चेन्नईला संकटात टाकले. सॅम्सने डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली यांना खातेही खोलू दिले नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट पडल्या. जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला (१) पायचीत पकडले. सॅम्सने पुन्हा गोलंदाजीला येत सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (७) यष्टीपाठी झेलबाद केले. अंबाती रायुडू (१०) आणि शिवम दुबे (१०) हे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. ३९ धावांत चेन्नईने आपले ६ फलंदाज गमावले. कप्तान महेंद्रसिंह धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी संघाला थो़डा आधार दिला, पण तो जास्त काळ टिकला नाही. १३व्या षटकात कुमार कार्तिकेयने ब्राव्हो (१२) आणि सिमरजित सिंग (२) यांना बाद करत चेन्नईची अवस्था ८ बाद ८० अशी केली. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा शेवटचा गडी मुकेश चौधरी धावबाद झाला आणि चेन्नईचा डाव ९७ धावांवर आटोपला. धोनीने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. मुंबईकडून सॅम्सने १६ धावांत ३ बळी घेतले. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांना २ विकेट घेता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com