मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. लीगच्या ५९व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सने चेन्नईला (CSK vs MI ) ५ गड्यांनी हरवले. वानखेडे मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहितने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डॅनियल सॅम्सचा जबरदस्त स्पेल आणि इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला अवघ्या ९७ धावांवर गुंडाळले. चेन्नईकडून कप्तान धोनीने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईने या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ५ गडी गमावले, पण १५व्या षटकात विजय मिळवला. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ३४ धावा केल्या.
मुंबईचा डाव
चेन्नईच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला चांगलाच घाम फुटला. वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने तीन विकेट्सचा भन्नाट स्पेल टाकत इशान किशन (६), डॅनियल सॅम्स (१) आणि पदार्पणवीर ट्रिस्टन स्टब्स (०) यांना माघारी धाडले. चांगल्या लयीत खेळणारा कप्तान रोहित शर्मा सिमरजित सिंगचा बळी ठरला. रोहितने ४ चौकारांसह १८ धावा केल्या. हृतिक शोकीन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा विजय निश्चित केला. शोकीन तेराव्या षटकात बाद झाला. त्याने १८ धावा केल्या. तर तिलकने ४ चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. १४.५ षटकात ५ गडी राखून मुंबईने विजयावर शिक्कामोर्तब केले.
Tilak Varma and Hrithik Shokeen steer Mumbai's chase after an early wobble, CSK are out of playoff contention #CSKvMI | #IPL2022
👉 https://t.co/XO4JoWD5Ul pic.twitter.com/CYAa7FAAhN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 12, 2022
#MumbaiIndians register their third win of the season!
The Rohit Sharma -led unit beat #CSK by 5 wickets to bag two more points. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/c5Cs6DHILi #TATAIPL #CSKvMI pic.twitter.com/gqV7iL5f4I
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
चेन्नईचा डाव
मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने धमाकेदार स्पेलसह सुरुवात केली आणि चेन्नईला संकटात टाकले. सॅम्सने डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली यांना खातेही खोलू दिले नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट पडल्या. जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला (१) पायचीत पकडले. सॅम्सने पुन्हा गोलंदाजीला येत सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (७) यष्टीपाठी झेलबाद केले. अंबाती रायुडू (१०) आणि शिवम दुबे (१०) हे फलंदाजही स्वस्तात बाद झाले. ३९ धावांत चेन्नईने आपले ६ फलंदाज गमावले. कप्तान महेंद्रसिंह धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी संघाला थो़डा आधार दिला, पण तो जास्त काळ टिकला नाही. १३व्या षटकात कुमार कार्तिकेयने ब्राव्हो (१२) आणि सिमरजित सिंग (२) यांना बाद करत चेन्नईची अवस्था ८ बाद ८० अशी केली. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा शेवटचा गडी मुकेश चौधरी धावबाद झाला आणि चेन्नईचा डाव ९७ धावांवर आटोपला. धोनीने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. मुंबईकडून सॅम्सने १६ धावांत ३ बळी घेतले. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांना २ विकेट घेता आल्या.
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कप्तान/यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, महेश थिक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com