मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने लीगच्या ५९व्या सामन्यात चेन्नईला ५ गड्यांनी हरवले. यानंतर चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने आपले मत दिले. या सामन्यात विजेच्या समस्येमुळे तांत्रिक बिघाड झाला आणि फलंदाजीदरम्यान चेन्नईला डीआरएसचे निर्णय घेता आले नाहीत.
वानखेडे स्टेडियमवर शॉर्ट सर्किटमुळे चेन्नईच्या डावाच्या पहिल्या १० चेंडूपर्यंत डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती, यादरम्यान काही निर्णय संघाच्या विरोधात गेल्याने संघाला नुकसानीचा सामना करावा लागला. चेन्नईचा फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हन कॉनवे त्याच्याविरुद्धच्या पायचीतचा निर्णय मागे घेऊ शकला नाही, रिप्लेमध्ये डॅनियल सॅम्सचा चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर येत असल्याचे दिसून आले. जसप्रीत बुमराहच्या पुढच्या षटकात रॉबिन उथप्पालाही पायचीत देण्यात आले.
Devon Conway couldn't avail DRS facility at Wankhede due to a power cut at the venue. https://t.co/qGtWMgurIL
— CricTracker (@Cricketracker) May 13, 2022
फ्लेमिंगने सामना संपल्यानंतर म्हटले, ”त्यावेळी असे घडणे थोडे दुर्दैवी होते. आम्ही थोडे निराश झालो, पण तोही खेळाचा एक भाग आहे. त्यावेळी काही निर्णय आमच्या बाजूने गेले नाहीत. आमच्यासाठी ही नक्कीच चांगली सुरुवात नव्हती. सामन्यात आमच्यासाठी खरोखर काही सकारात्मक बाबी होत्या. नवीन चेंडूसह मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांची गोलंदाजी उत्कृष्ट होती. तसेच दीपक चहरच्या पुनरागमनानंतर आमच्याकडे नवीन चेंडूने गोलंदाजी करण्यासाठी काही चांगले पर्याय असतील. आम्ही पाहिजे तसे खेळलो नाही. आता आम्ही स्पर्धेबाहेर झालो असून, उर्वरित दोन सामन्यांमध्ये आम्ही इतर खेळाडूंना खेळवू शकतो.”
Here's what #CSK coach Stephen Fleming had to say about the #CSKvMI encounter.#IPL2022 pic.twitter.com/7bQTpLxKxE
— 100MB (@100MasterBlastr) May 13, 2022
मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने आपल्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. बाँड म्हणाला, “संघाने गोलंदाजीमध्ये गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बुमराहने संपूर्ण मोसमात चांगली गोलंदाजी केली पण त्याला पाहिजे तितक्या विकेट मिळाल्या नाहीत.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com