मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदा नववा पराभव पत्करावा लागला. लीगच्या ६२व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईला (CSK vs GT) ७ गड्यांनी हरवले. या सामन्यात चेन्नईने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला संधी दिली. या १९ वर्षीय वेगवान गोलंदाजाची शैली लसिथ मलिंगासारखीच आहे. त्याने आपल्या पहिल्या आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला बाद केले. सामना संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने त्याच्याविषयी प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला. ”पाथिराना चांगला खेळाडू आहे. त्याची अॅक्शन अगदी मलिंगासारखीच आहे. त्याचा संथ गतीचा चेंडू खूप चांगला आहे. डेथ ओव्हरमध्ये तो चांगली गोलंदाजी करू शकतो.” पाथिराना अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही दिसला. त्याने आजच्या सामन्यात ३.१षटके टाकली आणि २४ धावांत २ बळी घेतले. या सामन्यापूर्वी त्याने फक्त २ टी-२० सामने खेळले होते आणि २ बळी घेतले होते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या दुखापतीनंतर संघाने त्याचा संघात समावेश केला होता. पण धोनीच्या बोलण्यावरून तो अधिक काळ संघात राहू शकतो हे स्पष्ट होते.
Debut…First Ball Wicket …Different Action…Malinga II, Everyone Happy…Captain's Praise …..
Those are the words used by the commentary box to explain the achievement of Matheesha Pathirana on his debut in IPL2022 for Chennai Super Kings.(Video Credit-BCCI)#CSK pic.twitter.com/CffXdouPlo
— srilankasports.com (@SLsportsdotcom) May 15, 2022
A dream debut for Matheesha Pathirana 😍#MatheeshaPathirana #CSKvsGT #IPL2022 pic.twitter.com/D0bZn42fo5
— Ranjeet – Wear Mask😷 (@ranjeetsaini7) May 15, 2022
गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत १३३ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. वृद्धिमान साहाने नाबाद ६७ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातचा १३ सामन्यांमधला हा १०वा विजय आहे. गुजरातने थेट क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com