मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६२ वा सामाना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात खेळला खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने दिलेल्या १३३ धावांच्या लक्षाचा गुजरातने ७ गडी राखून यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे गुजरातने गुणतलिकेतील पहिल्या स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. त्यांचे गुणतालिकेत २० अंक झाले आहेत.
गुजरातचा डाव
चेन्नईने दिलेल्या १३३ धावांच्या लक्ष्याचा गुजरातने ७ विकेट राखून यशस्वी पाठलाग केला. सलामीला आलेल्या वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी सावध सुरुवात केली. गिलला खास कामगिरी करता आली नाही तो १८ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीस आलेल्या मॅथ्यू वेडने आक्रमक फलंदाजी करताना २० धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला चांगली खेळी करता आली नाही. तो ७ धावांवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलेल्या डेव्हिड मिलरने वृद्धिमान सहाला साथ देत गुजरातला विजयापर्यंत पोहोचवले. गुजरात कडून वृद्धिमान सहा सर्वाधिक ६७ धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड मिलरही सावध खेळ दाखवत 15 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईसाठी गोलंदाजी करताना मथिशा पथिराना याने सर्वाधिक २ बळी मिळवले. तर मोईन अलीला १ गडी बाद करण्यात यश आले.
1⃣0⃣th win of the #TATAIPL 2022 for @gujarat_titans! 👏 👏
The @hardikpandya7-led unit beat #CSK by 7 wickets to pocket two more points. 👌 👌 #CSKvGT
Scorecard ▶️ https://t.co/wRjV4rXBkq pic.twitter.com/ZyQ9WjgTrP
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
चेन्नईचा डाव
चेन्नईकडून सामन्याची सुरुवात करताना डेवेन कॉन्वे (५) लवकरच बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलेल्या मोईन अलीने ऋतुराज गायकवाड सोबत डाव सावरला. त्यानंतर मोईन अली २१ धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या एन जगदीशनने (३९) ऋतुराज सोबत धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शिवम दुबेला खातेही उघडता आले नाही तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला धोनीलाही काही खास कामगिरी करता आली नाही तो (७) धावा करून माघारी परतला. ऋतुराज गायकवाडने चेन्नई कडून सर्वाधिक ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. गुजारतकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २ गडी बाद केले तर राशिद खान, अल्जारी जोसेफ आणि साई किशोरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<