मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कायरन पोलार्डचा आज वाढदिवस. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या या खेळाडूची ओळख भारतीयांसाठी आता मुंबई इंडियन्स (MI) चा खेळाडू म्हणून अधिक मोठी झाली आहे. तो २०१० मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. कायरन पोलार्डचा संघर्ष मात्र त्याच्या खेळापेक्षाही मोठा आहे. पोलार्डच्या लहानपणीच त्याच्या वडिलांनी घर सोडले होते. ते कधीही परत आलेच नाही. १२ मे १९८७ साली त्रिनिदादमध्ये पोलार्डचा जन्म झाला.
पोलार्डला त्याचे ध्येय मिळाले
पोलार्डच्या घरात मोठी बिकट परिस्थिती, दोन वेळच्या जेवणाची पण पंचायत होती. त्याची स्वप्न मोठी होती आणि स्वप्नांपेक्षा रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होता. पोलार्डच्या आईने आपल्या दोन मुली आणि एका मुलाची जबाबदारी आपल्या एकट्या खांद्यावर घेत टुनापूना-पिआरको नावाचं शहर गाठलं. खरं तर इथूनच पोलार्डची त्याच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू झाली. पोलार्डला स्वतःसोबतच त्याच्या कुटुंबाला सुद्धा सावरायच होतं. आव्हानं अनेक होती आणि त्यातच एक मोठं आव्हान म्हणजे वाईट सवयी आणि व्यसनं यापासून स्वतःला दूर ठेवणं. घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं आणि त्यात जर अशा व्यसनाधीनतेची भर पडली असती तर कदाचित आज जगासमोर कायरन पोलार्ड नावाचं वादळ उभं राहण्यापूर्वीच शांत झालं असतं.
True MI legend 💙 https://t.co/TyOxicsQun
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
गुन्हेगारी, क्रिकेट आणि पोलार्ड
पोलार्डच्या आयुष्यात त्याच्या समोर दोन पर्याय होते. एक चांगला आणि एक वाईट. क्राईम, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या, अनेक व्यसनं हा सहज आणि सोपा मार्ग पंरतू आयुष्य उदध्वस्त करणारा होता. तर दुसरीकडे कठीण, खडतर, मेहनतीचा पण भविष्य उज्वल असेल. त्यात पोलर्डने दुसरा मार्ग निवडला तो म्हणजे क्रिकेट आणि इथूनच त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. खरंतर क्रिकेट हा पोलार्डसाठी एक महागडा खेळ होता. लहानपणा पासूनच उंच खांदाबांधा व मजबूत शरीरयष्टी या दोन नैसर्गिक बाबींमुळे पोलार्डचे षटकारही नैसर्गिक वाटायचे. चौके आणि षटकारांच्या जोरावर सामने जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात होती. आजही पोलार्ड त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.
असा बनला पोलार्ड षटकारांचा बादशाह
वर्ष २००६ मध्ये पोलार्डला वेस्टइंडीजच्या अंडर १९ संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर टी-२० क्रिकेट सारखा अत्यंत कमी आणि मर्यादित षटकांचा खेळ आहे खेळण्याची त्याला संधी मिळाली.आज किरॉन पोलार्ड हा षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. पोलार्डच्या या दमदार खेळीवर सिलेक्टर्सची नजर पडली. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पोलार्डला वेस्टइंडिजच्या एकदिवशीय संघामध्ये संधी मिळाली. यानंतर कायरन पोलार्डने कधी मागे वळून पाहिले नाही. १५ वर्षांच्या करिअरमध्ये पोलार्डने आपलं ध्येय नक्कीच मिळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com