मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमने (Brendon Mccullum) संघाची रजा घेताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्क्युलमने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचे कौतुक केले असून त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ चांगल्या कर्णधाराच्या हातात असल्याचे म्हटले आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे .
मॅक्क्युलमची इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कारणास्तव तो यापुढे केकेआरला प्रशिक्षण देणार नाहीत. त्याच्या प्रशिक्षणाखाली केकेआरला त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪, 𝘽𝙖𝙯! 💜💛@Bazmccullum #AmiKKR #IPL2022 #ThankYouBaz pic.twitter.com/YmxZWY8afX
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 19, 2022
Goodbyes are never easy… Hope our paths cross again, @Bazmccullum 💜💛#AmiKKR #IPL2022 #ThankYouBaz pic.twitter.com/R0WSo7iMVz
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 20, 2022
केकेआर संघ सोडताना मॅक्क्युलमने कोलकाता संघातील आपल्या प्रवासाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी केकेआरचा प्रशिक्षक म्हणून तीन वर्षे घालवली आणि या काळात मी बायो-बबलमध्ये होतो. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो. प्रथम आयपीएलचे यजमान आणि नंतर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले चाहते. आयपीएल ही एक जबरदस्त स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. आयपीएलमधून अनेक नवीन गोष्टी समोर येतात.”
From smashing 158* in our very first game to mentoring the rising stars as a coach 💜
We will miss you, @Bazmccullum. Best wishes for your upcoming chapter! 🙌#KnightsTV presented by @glancescreen | #AmiKKR #ThankYouBaz #IPL2022 pic.twitter.com/RRsfRrCP74
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 19, 2022
मॅक्क्युलम पुढे म्हणाला, “प्रशिक्षक म्हणून मी खेळाडूंना आयपीएलमध्ये मुक्तपणे खेळण्याची परवानगी दिली आहे आणि त्यांना सकारात्मक पद्धतीने खेळण्यास सांगितले आहे. गेल्या काही वर्षांपासून मी येथे खूप छान वेळ घालवला आहे. या वर्षी आम्ही ते साध्य करू शकलो नाही. पण उत्तम क्रिकेट खेळलो. मी या संघाला फॉलो करत राहीन. मला माहीत आहे केकेआर संघ एका चांगल्या कर्णधार आणि सर्व सपोर्ट स्टाफच्या नेतृत्वाखाली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com