मुंबई : कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे आयपीएलचे नियोजन पुन्हा भारतातच करण्याचे नियोजन बीसीसीआय करत आहे. ज्यात सगळे सामने मुंबईत खेळविण्यात येणार असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. आयपीएलचे नियोजन कुठे व्हावे यासाठी २० फेब्रुवारी पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या निगडित असलेल्या सूत्रांकडून महिती मिळत आहे की , कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झळ अनेक राज्यांना बसत आहे. त्यात महाराष्ट्रात याचे प्रमाण जरा कमी आहे. आयपीएलचे संपूर्ण नियोजन वेगवेगळ्या शहरात करणे अशा स्थितीत शक्य नसल्याने मुंबई आयोजनाच्या दृष्टीने योग्य ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील वानखेडे , ब्रेबोन आणि नवी मुंबईतील डीवाय पाटिल स्टेडियम सामन्यांसाठी शोर्टलिस्ट केले गेले आहे.
२०२० आणि २०२१ मध्ये आयपीएलचे आयोजन दुबईत करण्यात आले होते . मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच यावर्षीच्या स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. आयपीएल २०२२चा हंगाम २७ मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी फेब्रुवारी मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. तसेच यंदाच्या हंगामापासून अहमदाबाद आणि लखनऊ सुपर जाईंट्स या २ नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
- शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय- प्रविण दरेकर
- “दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?”, राम सातपुतेंचा हल्लाबोल
- “ईसापूर धरणाला ‘अद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय’ नाव द्या”, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “केंद्राकडे ६२५ करोड रुपये पडून”, बिहारमधील NTPC परीक्षा घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाडांचा खुलासा