मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२च्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या मोसमात संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने सर्वाधिक वेळा टी-२० लीगचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू इतर संघात गेले आहेत. त्यात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि क्विंटन डी कॉक यांचा समावेश आहे. टी-२० लीगचा सध्याचा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर यांच्यात सामना होत आहे. मुंबईचा संघ पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल.
यावेळी आयपीएलमध्ये १० संघ उतरणार आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सने संघाच्या तयारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये संघाचा अनुभवी फलंदाज कायरन पोलार्ड मैदानाभोवती मोठे फटके खेळताना दिसत आहे. त्याचवेळी बेबी डिव्हिलियर्स या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविसही चांगली फटकेबाजी करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे मुंबईने त्याचा संघात समावेश केला आहे.
Exquisite shots, yorkers and class! 💙
📽️ Sit back and enjoy a minute long 🔥 net session featuring Polly, Boom and Brevis! 🤩#OneFamily #MumbaiIndians @KieronPollard55 @Jaspritbumrah93 MI TV pic.twitter.com/X0vz7qbHNx
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
यावेळी लिलावात मुंबई इंडियन्सने यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो सर्वात महागडा खेळाडू होता. याशिवाय संघाने सिंगापूरचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यांचाही संघात समावेश केला आहे. मात्र, आर्चर दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –