IPL 2022: १५व्या हंगामात लखनऊच्या ‘या’ युवा खेळाडुचीच हवा; धोनी स्टाईलने फिनिश तर कोहली स्टाईलने सेलिब्रेशन!

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सच्या युवा फलंदाज आयुष बदोनीने आतापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये आपल्या प्रतिभेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या ४ सामन्यांमध्ये त्याने आपल्या फटकेबाजीच्या शैलीने सर्वांना प्रभावित केले आहे. ज्या पद्धतीने तो क्रीझवर येऊन खेळ पूर्ण करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. १५ व्या सामन्यात तर खेळ संपल्यानंतर आयुष बदोनीने विराट कोहली आणि धोनीची झलक दाखवली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लखनऊसाठी (LSG) आयुष (Ayush badoni) दडपणाखालीही मैदानात उतरत आहे. यासोबतच तो प्रत्येक सामन्यात आपली क्षमता दाखवत असतो. धोनी (MS Dhoni) प्रमाणेच, IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने षटकार मारून संघाला सहज विजय मिळवून दिला. यानंतर खेळ संपल्यावर त्याने विराट कोहलीप्रमाणे (virat kohli) सेलिब्रेशन केले. त्याचा त्या अंदाजातला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

२२ वर्षीय आयुष बदोनीने विजयी षटकार ठोकल्यानंतर, कोहलीच्या शैलीत हाताने त्याच्या जर्सीच्या मागील बाजूस लिहिलेले त्याचे नाव आणि जर्सी क्रमांक दाखवला. त्याची खेळी मोठी नव्हती मात्र शेवटी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा त्याने सहज केल्या. त्याची शैली चाहत्यांना पुन्हा पुन्हा खूश करत आहे. आयुषने आतापर्यंत ४ डावात २ वेळा नाबाद राहिला आहे आणि दोन्ही वेळा संघाच्या मॅचविनिंग इनिंग्सही खेळल्या आहेत.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या