मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH VS KKR) विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने धमाका केला आणि २८ चेंडूत ४९ धावा केल्या. रसेलने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. केकेआरला रसेलच्या खेळीच्या जोरावर १७७ धावा करता आल्या. रसेलने धमाकेदार स्टाइलमध्ये फलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या इतिहासातील ४ आयपीएल हंगामात २५० हून अधिक धावा आणि १० हून अधिक बळी घेणारा रसेल हा एकमेव खेळाडू ठरला आहे. रसेलपूर्वी, जॅक कॅलिसने आयपीएलच्या ३ हंगामात २५० हून अधिक धावा आणि १० हून अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
Andre Russell is one of the great all-rounders in IPL history.
📸: Disney+Hotstar pic.twitter.com/1Tn8c0jLvD
— CricTracker (@Cricketracker) May 14, 2022
जॅक कॅलिस व्यतिरिक्त, पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने आयपीएलच्या २ हंगामात हा पराक्रम केला आहे, तर शेन वॉटसनने देखील आयपीएलच्या २ हंगामात २५० हून अधिक धावा आणि १० हून अधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. आयपीएल २०२२मध्ये, रसेलने आतापर्यंत ३३० धावा आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामाव्यतिरिक्त, रसेल २०१९च्या आयपीएलमध्ये ५१० धावा आणि ११ विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. २०१८मध्ये त्याने ३१६ धावांसह १३ विकेट घेतल्या. २०१५च्या मोसमात रसेलने ३२६ धावा आणि १४ विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com