IPL 2021 : सीएसके की, कोलकाता कोण जिंकणार ? डेल स्टेनने व्यक्त अंदाज

csk

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसऱ्या पात्रता फेरीत शानदार गोलंदाजी केल्यानंतर व्यंकटेश अय्यर-शुभमन गिलच्या फलंदाजीमुळे तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने 3 गडी राखून विजय मिळवला. दोन वेळचा चॅम्पियन केकेआर अंतिम फेरीत तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी सामना करेल. केकेआरने यापूर्वी दोनदा अंतिम फेरी गाठली आहे.

आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे. त्यामुळे कोणता संघ आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने याने कोणता संघ आयपीएल २०२१ जिंकणार यावर मोठं भाष्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार चेन्नई सुपर किंग्जचा संघ अंतिम सामना जिंकेल. डेल स्टेनच्या मते, केकेआर ज्या प्रकारे वाईट निर्णय घेतो आणि वरिष्ठ खेळाडूंचा खराब फॉर्ममुळे त्यांना अंतिम सामन्यात फटका बसू शकतो.

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत स्टेन म्हणाला, ‘मी नेहमीच आकडेवारींवर लक्ष देतो. हा सामना कॅसिनोसारखा असणार आहे. जर सलग १० वेळा काळा आला असेल, तर कधीतरी नक्कीच लाल असेल. मला असे वाटते की केकेआरला नक्कीच वाईट दिवस येतील. त्यांचे चुकीचे निर्णय आणि इऑन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांचा खराब फॉर्मचा फटका संघाला बसू शकतो. स्टेन पुढे म्हणाला, ‘सीएसके खूप अनुभवी तसेच चांगली टीम आहे. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. धोनीने दिल्लीविरुद्ध चांगली फलंदाजी केली आणि त्याचे कर्णधारपदही उत्कृष्ट राहिले. सध्या चेन्नईचे फलंदाज फॉर्मात आहेत. त्यामुळे माझ्या हा सामना केकेआर हारेल.’

महत्त्वाच्या बातम्या