IPL 2021: फाफ डु प्लेसिसच्या ऐवजी ‘हा’ खेळाडू ठरणार उत्तम पर्याय?

csk

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशीचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. परंतु त्याआधीच या लीगच्या फ्रँचाइझींना मोठे धक्के बसत आहे. स्थगित आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून काही खेळाडू माघार घेत आहेत तर काही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.

यातच चेन्नई सुपर किंग्जच्या बड्या खेळाडूला दुखापत झाल्याने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळण्यावर साशंकता आहे. 19 सप्टेंबरपासून उर्वरित हंगामातील पहिलाच सामना पार पडत आहे. पहिलाच सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा आहे. यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्समधील धुरंदर फाफ डु प्‍लेसी  दुखापतीमुळे आयपीएलमध्ये दिसणार नाही. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात  फाफ डु प्‍लेसी खेळण्यावर साशंकता आहे.

फाफ डु प्‍लेसीच्या अनुउपस्थितीत सीएसके रॉबिन उथप्पाला संघात सामील करू शकतो. आयपीएलमध्ये उथप्पा वरच्या क्रमांकावर आहे आणि अनुभवी फलंदाजांना डु प्लेसिसची जागा घेण्यासाठी आयपीएलमध्ये प्रचंड अनुभव आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात उथप्पाला राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. परंतु अद्यापही तो मैदानावर उतरला नाही. डु प्लेसिसच्या गैरहजेरीत त्याला पदार्पणाची योग्य वेळ आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये उथप्पा चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि गेल्या वर्षी खराब हंगामानंतर त्याने सीएसकेला अधिक वर नेण्याची अपेक्षा होती. त्यामुळे रॉबिन उथप्पा डु प्लेसिसची जागा घेऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या