…अखेर कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; आता ‘हा’ खेळाडू बनला केकेआरचा कर्णधार

dinesh kartik

दुबई- इंडियन प्रीमियर लीगचा रणसंग्राम चांगलाच रंगला आहे. विजेतेपद मिळविण्यासाठी कोलकात्याचा संघ देखील जोर लावत आहेत. मात्र आता आता कर्णधार दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर येत आहे.

गुणतालिकेत कोलकाता सध्या पाचव्या स्थानावर असून त्यांनी ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकताना ३ सामने गमावले आहेत. केकआर आज मुंबई इंडियन्सविरुद्ध सज्ज होत असतानाच केकेआर संघ व्यवस्थापनाने मोठी बातमी देताना कार्तिकने संघाचे नेतृत्त्व सोडल्याची माहिती दिली.दरम्यान, इंग्लडचा स्टार फलंदाज आयन मॉर्गनकडे कोलकात्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे

दिनेश कार्तिकने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो आणि असा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं धैर्य असावं लागते. त्याच्या या निर्णयामुळे आम्हाला आश्चर्य वाटले तरी आम्ही त्याच्या इच्छेचा आदर करतो. तसेच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार आयन मॉर्गन जो यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता तो आता संघाचं नेतृत्व करणार आहे हे आमचं भाग्यच आहे असे कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-