आयपीएल २०१९: राजस्थान आणि पंजाबमध्ये आज सामना

blank

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्या मध्ये सामना रंगणार आहे. हा सामना जयपूर मध्ये खेळला जाणार आहे. सलामीच्या सामन्यात विजय मिळवन्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. पंजाबच्या संघात आर. अश्विन, लोकेश राहुल, क्रिस गेल , मनदीप सिंग, डेव्हिड मिलर, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमीच्या समावेश आहे. हे सगळेच खेळाडू आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखले जातात.

दुसरीकडे राजस्थानच्या संघात अजिंक्य रहाणे, स्टीव स्मिथ, जयदेव उनाडकत, संजू सॅमसन, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, धवल कुलकर्णी, श्रेयस गोपाळ यांचा समावेश आहे. तडाखेबंद गालंदाज क्रिस गेलवर सगळ्याचं लक्ष असणार आहे. पंजाबच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आवाहन राजस्थानच्या गोलंदाजांना असणार आहे.