fbpx

आयपीएल २०१९ : मुंबईचा पहिला सामना आज दिल्लीशी

टीम महाराष्ट्र देशा :आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडिअन्सचा सलामीचा सामना आज वानखेडे स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. मुंबईची टीम ही आयपीएल मधील सर्वाधिक लोकप्रियता असलेली टीम आहे. त्यामुळे मुंबई आपल्या अभियानाची सुरुवात कशी करते हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, पोलार्ड, युवराजसिंग, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, बेन कटिंग अशा दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या ताफ्यात श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, हनुमा विहारी, अमित मिश्रा, इशांत शर्मा, कगीसो रबाडा, ट्रेंट बोल्ट अशा एकहाती सामना फिरवणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीत होणाऱ्या सामन्यात वेगळाच रोमांच पाहायला मिळणार आहे.