fbpx

आजचा सामना ठरवणार केकेआरचे स्पर्धेतील भवितव्य

टीम महाराष्ट्र देशा- इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बाद फेरी गाठण्याच्या आशा शाबूत ठेवायच्या असतील तर कोलकाता नाइट रायडर्सला सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य आहे. केकेआरचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १३ सामन्यांत ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. त्यामुळे हा विजय त्यांचे बाद फेरीतील स्थान नक्की करणारा असेल.

केकेआरने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला धूळ चारल्याने त्यांचेही मनोबळ वाढले. त्या सामन्यात कुलदीप यादवने चार गडी बाद केले.ख्रिस लीन, सुनील नारायण आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांची कामगिरी संघाच्या यशसाठी निर्णायक ठरू शकेल.

सनरायझर्सची जमेची बाजू त्यांची गोलंदाजी आहे. पण आरसीबीविरुद्ध गोलंदाजीच ढेपाळली. प्ले आॅफआधी चुकांवर तोडगा शोधण्याचा संघाचा प्रयत्न असेल. सनरायझर्स बासिल थम्पीला बाहेर बसवू शकतो. भुवनेश्वर कुमार सामन्यात पुनरागमन करणार असून त्याला सिद्धार्थ कौल, राशिद खान आणि शाकिब अल हसन यांची साथ लाभणार आहे.