११ वर्षात १४ सामने खेळणारा ‘हा’ खेळाडू झालाय के के आर चा कॅप्टन

टीम महाराष्ट्र देशा : ११ वर्षात १४ आंतरराष्ट्रीय टी -२० सामने हे आकडे आश्चर्यचकित करतात. भारतीय संघात असा एक खेळाडू आहे ज्याने ११ वर्षात फक्त १४ आंतरराष्ट्रीय टी -२० सामने खेळले आहेत. आणि विशेष म्हणजे भारतीय संघाने खेळलेल्या आपल्या पहिल्या टी -२० सामन्यात हा खेळाडू ‘सामनावीर’ होता. जर हा खेळाडू चांगला खेळू शकला असता तर भारतीय संघात ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंग धोनीची एन्ट्रीच झाली नसती. तो खेळाडू आहे ‘दिनेश कार्तिक’, आता दिनेश कार्तिकला कोलकाता नाईट राइडर्स संघाचा कर्णधार बनवण्यात आल आहे.

Loading...

आयपीएलच्या ११ व्या हंगामासाठी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची कोलकाता नाईट राईडर्स संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. तर केकेआरकडून २०१४ पासून खेळत असलेल्या रॉबिन उथप्पाची उप कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

गौतम गंभीर कोलकाता नाईट राईडर्सचा यापूर्वीचा कर्णधार होता. ३२ वर्षीय कार्तिकने आयपीएलचे १५२ सामने खेळले आहेत. केकेआरने यावेळी त्याला ७.४ कोटीला खरेदी केले आहे.

निवडी बद्दल दिनेश कार्तिक म्हणाला की, कोलकता नाईट रायडर्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅन्चायझीं पैकी एक आहे, त्यांनी मला एक चांगले आव्हान दिले आहे. केकेआर संघात चांगले खेळाडू घेतले आहेत, ज्यामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल राखण्यात आला आहे. मी केकेआर आणि लाखों केकेआर चाहत्यांच्यासाठी चांगले प्रतिनिधित्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.Loading…


Loading…

Loading...