fbpx

आयपीएलमध्ये चेन्नईचा सुपर विजय; तिसऱ्यांदा ठरले जेतेपदाचे मानकरी

मुंबई : आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत, जेतेपदाला गवसणी घातली. २ वर्षांच्या बंदीनंतर प्रथमचं आयपीएल खेळणाऱ्या चेन्नईचं हे तिसरं विजेतेपद आहे. यापूर्वी 2010 आणि 2011 साली चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. चेन्नईच्या विजयात शेन वॉटसनची खेळी निर्णायक ठरली त्याच्या शतकाने सनरायझर्स हैदराबादच्या विजेते होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावा केल्या. तर.युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी करत 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.

मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर शेन वॉटसने धडाकेबाज फटकेबाजी करत सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले आणि चेन्नईने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद 117 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने अंतिम सामन्यात हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

1 Comment

Click here to post a comment