चेन्नई सुपरकिंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सवर थरारक विजय

sam-billings-ipl

टीम महाराष्ट्र देशा- ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजानं अखेरच्या फटकावलेल्या 19 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या रणांगणात सलग दुसरा सनसनाटी विजय मिळवून दिला.सॅम बिलिंग्ज आणि शेन वॉटसन यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा ५ गडी आणि एक चेंडू राखून पराभव करीत सलग दुसरा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेले २०३ धावांचे दिलेले कठीण लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जने १९.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सॅम बिलिंग्जने सर्वाधिक २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. शेन वॉटसनने १९ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह ४२, अम्बाती रायुडूने २६ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांसह ३९, आणि धोनीने २८ चेंडूंत २५ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून टॉम कुरेनने २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, आंद्रे रसेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने ६ बाद २०२ धावा फटकावल्या.आंद्रे रसलने तुफानी खेळी करत केलेल्या ८८ धावांच्या मदतीने कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नईसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. रसल फलंदाजीसाठी आला तेव्हा संघाची धावसंख्या ८९ वर ५ विकेट्स होती. मात्र रसलने कर्णधार दिनेश कार्तिकसोबत संघाचा डाव सावरला. रसलने फक्त ३६ चेंडूत ८८ धावा ठोकल्या. आपल्या या डावात त्याने ११ षटकार आणि एक चौकार लगावला. आयपीएलच्या या हंगामातील हा आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : २0 षटकांत ६ बाद २0२.
(आंद्रे रसेल नाबाद ८८, रॉबिन उथप्पा २९, दिनेश कार्तिक २६, ख्रिस लिन २२. शेन वॉटसन २/३९, जडेजा १/१९, शार्दुल १/३७, हरभजन १/११).
चेन्नई सुपर किंग्ज : १९.५ षटकांत ५ बाद २0५.
(सॅम बिलिंग्ज ५६, शेन वॉटसन ४२, अम्बाती रायुडू ३९, धोनी २५. टॉम कुरेन २/३९. पीयूष चावला १/४९, सुनील नारायण १/१७, कुलदीप यादव १/२७).