आयपीएल-२०१८: लिलावात ‘बेन स्टोक्स’ सुपरहिट राजस्थान रॉयल्सने केले करारबद्ध

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडचा ऊत्कृष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला दोन वर्षाच्या बंदीनंतर आयपीएल मधे पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने १२.५ कोटी रुपयात बेंगलोर येथे सुरू आयपीएल च्या लिलावात करारबद्ध केले.

बेन स्टोक्सला त्याच्या अष्टपैलू कामगिरी करण्याच्या क्षमतेमुळे त्याला आयपीएल मधिल सर्वच संघ करारबद्ध करण्यासाठी ऊत्सुक होते. गेल्या दोन तीन महिण्यांपासून २०१८ च्या मोसमात बेन स्टोक्स कोणत्या संघाकडून खेळेल व लिलावात त्याच्यावर कीती रुपयांची बोली लागेल याविषयी सर्वत्र चर्चा होती.

 

आयपीएलच्या गेल्या मोसमात बेन स्टोक्स राइजिंग पुणे सुपरजायंन्ट्स कडून खेळला होता. या मोसमात पुणे संघ नसल्याने राईट टू मँच कार्ड वापरण्याचा पर्याय कोणाकडेही नव्हता. त्यामुळे या लिलावात बेन स्टोक्स सर्व संघांसाठी ऊपलब्ध होता. प्रत्यक्ष लिलावात मात्र राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.

बेन स्टोक्सला आपल्या संघांत घेण्यासाठी प्रथम चैन्नई सुपर किंग्स व किंग्स इलेवन पंजाब यांच्यात चुरस लागली होती. त्याचबरोबर यामधे कोलकाता नाइट राइडर्सनेही ऊत्सुकता दाखवली होती पण शेवटी राजस्थान रॉयल्सने १२.५ कोटींची बोली लावून आघाडी घेतली.

राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्स बरोबर अजिंक्य रहाणेलाही राईट टू मँच कार्ड वापरून ४ कोटी रुपयात करारबद्ध केले.राहने साठी मुंबई इंडियन्स व किंग्स इलेवन पंजाब सुद्धा ऊत्सुक होते पण राईट टू मँच कार्ड मुळे राहनेला आपल्याकडे खेचण्यात राजस्थान रॉयल्सला यश आले.

ben stocks

You might also like
Comments
Loading...