महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

आयफोन 8 ची प्रतीक्षा संपली;आज होणार लाँच

जाणून घ्या काय असतील नवीन फिचर

129

वेबटीम-अॅपल तरुणांना मध्ये सर्वाधिक क्रेझ असलेला मोबाईल ब्रॅड.अॅपल च्या आज पर्यत ७ सिरीज बाजारात उपलब्ध आहे,पण अॅपल च्या आज लॉनच होणाऱ्या ८ व्या सिरीज कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अॅपल 12 सप्टेंबरला म्हणजे आज आयफोन ८ लाँच करणार आहे. पण त्याआआधीच या फोनबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. काही रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनचं नाव आयफोन X असेल. आयफोन ८बद्दल याआधीही काही रिपोर्ट लीक झाले आहेत. आयफोन ८ नेमका असणार कसा याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

या बरोबरच नवीन ऍपल कॅम्पस मधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये  लॉन्चिंग होत आहे.नव्या आयफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल होणार असल्याची सध्या चर्चा आहे. यामध्ये बेजल-फ्री OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा सर्वात मोठा बदल असेल.

आयफोन 8 मध्ये फ्रंट कॅमेऱ्यात 3D फेस स्कॅनिंग असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे फक्त चेहरा पाहूनच आयफोन अनलॉक होईल. आतापर्यंत टच आयडी सेंसर तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.

या नव्या स्मार्टफोनची किंमत किती असणार याची सध्या बरीच चर्चा आहे. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असेल असंही समजतं आहे. याची किंमत 999 डॉलरपेक्षा जास्त असू शकते. आयफोन 7चं सर्वात महागड्या व्हेरिएंटची किंमत 969 डॉलर आहे.

आयफोन 8 मध्ये कंपनी वायरलेस चार्जिंग फीचरही देऊ शकतं. आयफोनमध्ये आतापर्यंत Qi चार्जिंगचा वापर करण्यात आला आहे. पण बाजाराची गरज ओळखता आयफोन वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देऊ शकतं.

आयफोन टच होम बटन काढून त्याऐवजी दुसरं फीचर देऊ शकतं असं म्हटलं जात आहे. मात्र, नेमकं कोणतं फिचर मिळणार याबाबत सध्या नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

अॅपलचा आगामी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. फोनच्या लाँचिंगला काही तास उरलेले असतानाही या फोनच्या नेमक्या फीचर्सबद्दल सस्पेंस कायम आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल आयफोन X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल. आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन्ही फोनसोबत हा फोन लाँच केला जाईल. कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत अमेरिकेत 1000 डॉलर म्हणजे जवळपास 63 हजार 785 रुपये (कर, सेस वगळून) असण्याची शक्यता आहे.

अॅपल इव्हेंट कसा पाहणार?

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 12 सप्टेंबर रोजी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे फोन लाँच करतील. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 10 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. दरवर्षीप्रमाणे अॅपलच्या वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल.

लाँचिंगनंतर साधारणतः एका आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र आयफोन 8 साठी 15 सप्टेंबरपासूनच प्री बुकिंग करता येईल. तर 22 सप्टेंबरपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.

Related Posts
1 of 727

अॅपल इव्हेंटमध्ये कोणते फोन लाँच होणार?

आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन अॅपलच्या कार्यक्रमात लाँच होणार आहेत. अॅपलने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आयफोन X हा खास फोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन X ला नवं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी लाँच केलेल्या आयफोन 7 पेक्षा या फोनमध्ये अपडेटेड फीचर्स असतील. फोनच्या डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित आहेत. तर आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल. दरम्यान आयफोन X हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असेल, असं बोललं जात आहे.

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे फीचर्स

आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची, तर आयफोन 8 प्लसमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन 8 प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या सर्व फीचर्सबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे.

अॅपल वॉच 3

या आयफोन इव्हेंटमध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X या फोनसोबत एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे.

अॅपल 4K टीव्ही

4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार या अॅपल टीव्हीमध्ये 4K रिझोल्युशनसह लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर असेल.

अॅपल iOS 11, MacOS High Sierra, अॅपल वॉच OS 4

आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Comments
Loading...