टीम महाराष्ट्र देशा: Apple ने सप्टेंबर महिन्यामध्ये आपली नवीन सिरीज iPhone 14 लाँच केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या मॉडेल्सचा समावेश आहे. Apple iPhone 14 या मॉडेलची भारतामध्ये सुरुवातीची किंमत 79,900 रुपये एवढी होती. पण Apple च्या या मॉडेलवर खास डिस्काउंट ऑफर आहे. याऑफरअंतर्गत, तुम्ही 7 हजार रुपयांच्या सवलतीवर हा फोन खरेदी करू शकता.
Apple iPhone 14 हा मोबाईल जिओ मार्ट (Jio Mart) वर 2,000 रुपयांच्या सवलतीसह सूचीबद्द करण्यात आलेला आहे. या ऑफर नंतर या मोबाईलची किंमत 77,900 रुपये एवढी झाली आहे. त्याचबरोबर एचडीएफसी (HDFC) बँकेचे क्रेडिट कार्ड (Cradit Card) वापरल्यास ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जाईल. या सर्व सवलती नंतर iPhone 14 या मॉडेलची किंमत 72,900 एवढी झाली आहे. कृपया लक्षात घ्या की ही ऑफर फक्त आणि फक्त जिओ मार्ट (Jio Mart) वरच उपलब्ध आहे.
Apple iPhone 14 फीचर्स
Apple iPhone 14 हा स्मार्टफोन A15 बायोनिक चीपसेटसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये ड्युअल परफॉर्मन्स सोबत 6- कोर CPU आणि 4 कार्यक्षमता कोर, 5-कोर GPU आणि 16-कोर न्यूरल इंजिन दिलेले आहे. हा स्मार्टफोन iPhone iOS 16 वर काम करतो.iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले 460 पिक्सेल घनता प्रति इंच आहे. हा स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनचा कॅमेरा बद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये ड्युअल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये f/1.5 अपर्चर आणि सेन्सर शिफ्ट आर्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
त्याचबरोबर यामध्ये 12MP प्राइमरी सेन्सर उपलब्ध आहे. तर, सेल्फी साठी यामध्ये f/1.9 अपर्चरसह 12MP चा सेन्सर देण्यात आला आहे.iPhone 14 हा स्मार्टफोन 5G तंत्रज्ञानासह सुसज्ज असून यामध्ये स्टोरेजसाठी तीन पर्याय दिलेले आहे. ज्यामध्ये 128GB,256GB आणि 512GB यांचा समावेश आहे.