मुंबई : नवीन फोन घ्यायचं म्हंटल की आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे नाव आठवतात. अशा अनेक मोबाईल कंपन्या आहेत, ज्यांच्या किंमती अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कमीतकमी किंमतीत मोबाईल विकत घेता येतो. मात्र मोबाईलमध्ये आयफोन (iPhone) म्हटलं की सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. कारण या कंपनीच्या फोनची किंमतही जास्त असते. एखाद्याकडे जर आयफोन (iPhone) असेल तर तो त्या आयफोनला सर्वांसमोर अभिमानाने मिरवतो.
तस पाहिलं तर आयफोन (iPhone) वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तो फोन महागडा जरी असला तरी लोकं त्यालाच पसंती देत आहेत. कारण आयफोन वापरताना इतर फोनपेक्षा तो चांगल्या सुविधा पुरवतो. अशा काळात तुम्हीही जर कमी किंमतीत आयफोन (iPhone) घ्यायचा विचार करत असाल तर आयफोन १३ (iPhone 13) खरेदी करण्यासाठी तुम्हाला उत्तम संधी आहे. यामागच कारण असं आहे की तुम्ही हा फोन खरेदी करताना १२ ते १३ हजार रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
सध्या आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे चांगली संधी आहे. तुम्ही Imagine Apple Premium Reseller Store वरून आयफोन १३ (iPhone 13) स्वस्तात खरेदी करू शकता. त्याठिकाणी तुम्हाला आयफोन १३ (iPhone 13) वर ८ हजार ४०० ची थेट सूट मिळणार. जर तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला ४ हजारची अतिरिक्त सूट मिळेल. अशाप्रकारे, तुम्हाला iPhone 13 च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडेलवर एकूण १२ हजार ४०० रुपयांची सूट मिळेल. जर तुमच्याकडे चांगला जुना फोन असेल तर तुम्हाला १९ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. त्यानंतर फोनची किंमत ४८ हजार ५०० रुपये होईल.
आयफोन १३ (iPhone 13) मध्ये ६ कोर सीपीयु (CPU) सह A15 बायोनिक प्रोसेसर आहे. याशिवाय यात १६ कोअर न्यूरल इंजिन आहे. Apple कधीही रॅम आणि बॅटरीबद्दल अधिकृत माहिती देत नाही. आयफोन १३ (iPhone 13) सह, ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल. आयफोन १३ (iPhone 13) मध्ये १००० nits ब्राइटनेससह ६.१-इंच रेटिना XDR डिस्प्ले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; जयंत पाटलांचं मोठं विधान
- S Sreesanth : “विराटच्या टीममध्ये असतो तर…”, भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- Devendra Fadnavis | सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आमची केस…”
- Sanjay Raut। खासदार कोणत्या मजबुरीतून सोडून गेले हे आम्हाला माहिती आहे, यामध्ये राजकारण अजिबात नाही : संजय राऊत
- Eknath shinde vs shiv sena : पक्ष सोडला नाही तर पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होणार?; हरीश साळवेंचा सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<