‘त्या’ गुन्हेगाराचा तब्बल ३० गुन्ह्यांत सहभाग

औरंगाबाद: बनावट कागदपत्रांआधारे रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करत आरटीओ कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी मिर्झा अकबर बेग मिर्झा नवाब बेग (५०, रा. कटकट गेट) याने पोलीस कोठडीत फसवणुकीची माहिती दिली.

बनवाट अहवाल, स्वाक्षरी, शिक्का व रिक्षा स्क्रॅप केल्याचा एडीट केलेला फोटो तनवीर नावाच्या व्यक्तीकडून बनविल्याची त्याने कबुली दिली. तसेच रिक्षाचा बनावट चेसीस क्रमांक फारुक या व्यक्तीच्या भंगर दुकानातून बनवून घेतल्याचे सांगितले. सदरील गुन्हा कासिम आणि तनवीर यांच्या मदतीने केल्याची कबुलीही आरोपीने दिली. सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी आरोपीवर ३० गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या सहकाऱ्यांना अटक करणे असल्याने त्याच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली.

सुनावणीअंती मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीत ४ मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.प्रकरणात प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रवींद्र दत्तात्रय नारळे (३६) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा.मकसुद कॉलनी, रोशनगेट) व त्याच्या साथीदारांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

IMP