मुंबई : शिवसेना नेत्या दीपाली सय्यद आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात थोडे नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. राऊत हे नेहमीच बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत असतात. मात्र दीपाली सय्यद यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थी व्हावी, अशी विधाने केली आहे.
त्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना दीपाली सय्यद या शिवसेनेच्या प्रवक्त्या नाहीत, असे मत मांडले होते. त्यावरूनच दीपाली सय्यद यांनी काल (रविवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना टोला लागवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांनी शांतता घ्यावी, असा सल्ला देखील दिला आहे.
दरम्यान या प्रकरणावर दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा ट्वीट केले आहे. मला शिवसेना नेत्या पद हे अनिल देसाईसाहेबांच्या आदेशाने मिळाले आहे. वैध किअवैध यांवर चर्चा नको. परंतु त्याबद्दल संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी हे स्पष्ट आहे. माझी भुमिका मध्यस्तीची असल्याने राऊत साहेबांनी मोठ्या मनाने माफ करून सन्मानाने आमदारांना चर्चेला बोलवावे मार्ग निघेल.
मला शिवसेना नेत्या पद हे अनिल देसाईसाहेबांच्या आदेशाने,ते वैधकिअवैध यांवर चर्चा नको परंतु त्याबद्दल माननीय संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी हे स्पष्ट आहे. माझी भुमिका मध्यस्तीची असल्याने राऊत साहेबांनी मोठ्या मनाने माफ करून सन्मानाने आमदारांना चर्चेला बोलवावे मार्ग निघेल.
— Deepali Sayed (@deepalisayed) July 18, 2022
“मी एक शिवसैनिक आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला भावना व्यक्त करायचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. हे तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं, हीच माझी इच्छा आहे”, असे प्रत्युत्तर सय्यद यांनी राऊतांना दिले आहे.
याचबरोबर पुढे बोलताना दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas kadam : “शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून… “; रामदास कदमांच गंभीर विधान
- IND vs ENG : “धोनी आणि रोहित शर्माची नेतृत्वशैली एकसमान”, भारताच्या माजी फिरकीपटूची प्रतिक्रीया
- Sanjay Raut | संजय राऊत हाजीर हो..! मुंबई न्यायालयाचे निर्देश
- Bus accident in Indore : गिरीश महाजन मध्य प्रदेशला रवाना; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्ताराची सूत्र दिल्लीतून हलणार; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<