मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यातील राजकारणात एकच भूकंप झाला. ४० हून अधिक आमदारांचे समर्थन शिंदे यांना असल्याने शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या आमदारांचा हॉटेलवर होणारा खर्च देखील चर्चेचा विषय ठरलाय.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा सगळा कोट्यवधीचा खर्च कोण पुरवतय याबाबत इन्कम टॅक्स व ईडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे. याबाबत बोलताना तपासे यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडावं, यासाठी काही अदृश्य शक्ती सध्या काम करतायत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हा काळा पैसा कोणी पूरवला याची शहानिशा खातरजमा इन्कम टॅक्स विभागाने इडी विभागाने केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<