अजिंक्य देव दिसणार बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत

अजिंक्य देव

मुंबई : स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नवी ऐतिहासिक मालिका घेऊन येणार आहेत.  २६ जुलैपासून रात्री १० वाजता ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका सुरू होणार असून  स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका  साकारणार आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूक माझ्यासाठी नवा आहे. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं,’ असे ते म्हणाले.

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत.

तर पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ सादर करताना अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP