‘पेगासास फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा’; शिवसेनेची मागणी

narendra modi vs shivsena

नवी दिल्ली : कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

अशातच पेगासास प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून दुसऱ्या दिवशी देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालं. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना देखील अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘आम्ही फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशीची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांना करणार आहोत. काल संबंधित मंत्र्यांनी खुलासा केला असला तरी तो योग्य नव्हता.’ यासोबतच, आज लोकसभेत इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी ही मागणी शिवसेनेनं केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP