‘मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या राऊत यांच्या वक्तव्याची चौकशी करा’

narendra-patil

मुंबई- उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यामागील अडचणी काही संपताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आधी वाढीव वीजबिले आणि आता पदभरती प्रक्रियेमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत विविध माध्यमांशी बोलताना महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमधील एसईबीसी प्रवर्गातील मराठा समाजातील तरुणांवर अन्याय न होऊ देता त्यांना देखील घेतलं नोकरीत समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगत आहेत.

एका बाजूला हे सुरु असताना प्रत्यक्षात जी ऊर्जा विभाकडून काढण्यात आलेले जे परिपत्रक आहे, यामध्ये मात्र उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्ग सोडून जे इतर प्रवर्गातील तरुण आहेत त्यांना घेतलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हा सर्व प्रकार समोर आल्याने आता मराठा समाजातील नेते आक्रमक होऊ लागले आहेत. खोटं बोलून मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या नितीन राऊत यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रश्नी लक्ष घालून मराठा समाजातील मुलांमध्ये सुरू असलेला संभ्रम दूर करावा असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या