जननी शिशु योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारने सुरु केलेल्या जननी शीशु योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारच्या विरोधात आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी महिला पार्टिच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

माता मृत्यु व बाल मृत्यु रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जननी शिशु योजनेचा गेल्या तीन वर्षात एकाही महिलेला याचा फायदा झाला नाही. त्याचबरोबर राज्यात एकूण 16 शासकीय महाविद्यालय आहेत यामधे दरवर्षी दीड लाख महिलांची प्रसूति होत असते तरी देखील यातील एकही महिलेला याचा फायदा झालांच नाही व कायमच माता मृत्यु व बाल मृत्युचे प्रमाण वाढतच आहे या योजनेमुळे राज्यात सन 2016 17 मधे एकूण1359 माता मृत्यु झाले आहे त्यामुळे या योजनेत गौड़बंगाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे