रॉयटर्स वृत्तसंस्थेकडून भारत आणि काश्मिर वेगळे दाखवण्याचा उद्दामपणा

kashmir

सह्याद्री वृत्त सेवा: नुकतेच झालेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपाने जम्मू आणि काश्मिर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या घडामोडींचे वार्तांकन करताना नामांकीत वृत्तसंस्था रॉयटर्सने ‘भारतातील भाजपाने काश्मिरमधील सरकारचा पाठिंबा काढला’ असे आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

रॉयटर्स ने आपल्या वृत्ताच्या मथळयामध्ये म्हणले आहे की, ‘Withdrawal of India’s BJP from Kashmir government could herald ‘muscular policy’’.
भारताने स्वातंञ्यापासून जम्मू आणि काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे आंतरराष्ट्रीय पटलावर ठामपणे सांगितले आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिर लवकरात लवकर भारताकडे हस्तांतरीत केला जावा, यासाठी चर्चा करण्याची तयारी देखील दाखवली आहे. माञ, पश्चिमेकडील देश आणि त्यांच्या संस्था अशा प्रकारे विचिञ भूमिका मांडून आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात.

यापूर्वी गेल्या आठवडयात संयुक्त राष्ट्र संघाने देखील काश्मिर संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवलेला असून, हा अहवाल फेटाळून लावला आहे.

दरम्यान, हे वृत्त रॉयटर्सने मागे घ्यावे आणि माफी मागावी. तसेच भारत सरकारने अशा प्रकारचे वार्तांकन करणा-या प्रसारमाध्यम संस्थांवर निर्बंध आणावेत, अशी भावना व्यक्त सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त आहे.

काश्मिरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही : गुलाब नबी आझाद

https://in.reuters.com/article/bjp-pdp-kashmir/withdrawal-of-indias-bjp-from-kashmir-government-could-herald-muscular-policy-idINKBN1JF10WLoading…
Loading...