लोकसभेची सेमीफायनल- अटलबिहारींच्या पुतणीनेच वाढवली चावलवाला बाबांची धाकधूक

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश मध्ये अजून चित्र अस्पष्ठ आहे.

छत्तीसगड मध्ये काँग्रेसने सलग 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या रमण सिंह यांना रोखण्यासाठी वाजपेयींच्या पुतणीलाच मैदानात उतरवलं होत. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला या रमण सिंह यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीलाच रमण सिंह हे जवळपास दीड हजार मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे काँग्रेसच्या या खेळीला यश येताना दिसतंय. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने ५९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भाजप २४ जागांवरती आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये रमण सिंह मागचे १५ वर्ष मुख्यमंत्री आहेत.ही निवडणूक जिंकली असता रमणसिंह सलग चौथ्या वेळी मुख्यमंत्री झाले असते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता भाजपला सत्ता राखणे अवघड आहे.

 

पाच राज्यातील निवडणुकांचे उद्या निकाल, लोकसभेच्या सेमीफायनलकडे अवघ्या देशाचे लक्षLoading…
Loading...