मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात

मुंबई : प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला आज मुंबईत अपघात झाला आहे. चुनाभट्टीत एका चढणीवर ब्रेक दाबल्याने चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एक गाडी सुधीर गाडगीळ यांची होती. सुदैवानं, गाडगीळ यांना दुखापत झालेली नाही.

चुनाभट्टी येथील चढाववर हा अपघात झाला. कारने ब्रेक दाबल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात सुधीर गाडगीळ यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

PHOTO : पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ विचित्र अपघात

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.