राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खरं ! मुंबई पुण्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढले

नवी दिल्ली: राज ठाकरे यांनी आपला मनसे पक्ष स्थापन केला तेव्हा परप्रांतीयां विराधात मोर्चा खोलला होता. तेव्हा देशभरात राज ठाकरे यांच्या विरोधात देशभरातून टीका होत होती. राज ठाकरे हे आपल्या स्टाईल मध्ये नेहमी सांगतात की, परप्रांतीय लोंढे शहर गिळून टाकतील. आता मात्र त्यांचं हे भाकीत खरं ठरताना दिसत आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबत धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परराज्यातील लोंढ्यांचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं समोर आलं आहे.

जगातील वेगाने वाढणाऱ्या 100 शहरांमध्ये प्रचंड स्थलांतर होत असून, या यादीत तब्बल 25 शहरं भारतातील आहेत. महत्त्वाचं म्हणजे खचाखच भरलेल्या शहरांच्या यादीत, पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाताचा समावेश आहे. तर आशिया खंडात पुणे आणि सुरत ही दोन शहरं स्थलांतरबाधित असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. या अहवालातील आणखी एक अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, सर्वाधिक स्थलांतर करणारं राज्य म्हणून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे.