औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद

इंटरनेट सेवा बंद

औरंगाबाद  : भीमा – कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये आज बंदची हाक पुकारली असतांनाच औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर बस सेवा आणि शाळादेखील बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान,देवगिरी शाळेच्या सहलीची बस देखील फो़डण्यात आली असून दौलताबादमध्ये अन्य एका शाळेच्या बसवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमवारी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कालपासूनच औरंगाबादमध्ये बससेवा विस्कळीत झाली आहे. तर संध्याकाळी क्रांतिचौक, उस्मानपुरा, पीर बाजार, मुकुंदवाडी, सातारा, जटवाडा, टीव्ही सेंटर या भागातील बाजारपेठा जबरदस्तीने बंद करण्यात आल्या होत्या.