स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात इंटरनेट सेवा बंद

जम्मू : ७१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काश्मीर खो-यात इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली. काश्मीर खो-यात केवळ भारत दूरसंचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीची लॅण्डलाईन सेवा सुरू आहे, अशी माहिती येथील अधिका-यांकडून देण्यात आली आहे. श्रीनगरमधील काही भागात ही इंटरनेट आणि मोबाईल सेवा स्थगित करण्यात आली आहे. खानयार, नौहट्टा, रैनावाडी, एमआर गंज, सफाकदल, मैसूना, करालखुड आणि राम मुंशी बाग यासारख्यां भागात सुरक्षतेच्या पार्श्वभूमीवर मोबाईल सेवा स्थगित करण्यात आली आहे.