अमित शहा म्हणतात, जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट महत्त्वाचं की सुरक्षा

blank

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. इंटरनेट बंद आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे काश्मीरमधील जनजीवन कधी कधी सुरळीत होणार ? असा प्रश्न राज्यसभा सदस्य गुलाम नबी आझाद यांनी विचरला. तसेच जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी नेमके किती दिवस लागतील, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी खासदार माजिद मेमन यांनी केली.

या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यान दिले. ते म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. मात्र, काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकच्या कारवाया अजूनही सुरू आहेत,’ असं सांगतानाच, ‘इंटरनेट जास्त महत्त्वाचे आहे की सुरक्षा?,’ असा प्रतिप्रश्न शहा यांनी विरोधकांनाच विचारला. तसेच ‘काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. २०४१२ शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षा देखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यातही १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सफरचंदाचं पीकही घेतलं जात आहे.

ते पुढे म्हणाले, ” कलम ३७० रद्द केल्यापासून राज्यात दगडफेकीच्या घटना खूपच कमी झाल्या असून पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांवर एकही गोळी चालवण्यात आलेली नाही’. तसेच राज्यात औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. औषधांच्या पुरवठ्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत,’ अशी माहितीही शहा यांनी दिली.

दरम्यान, इंटरनेट बंदीवर बोलताना ते म्हणाले, ”इंटरनेट हे संवादाचे व माहितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र, काही वेळा प्राधान्यक्रम बघावे लागतात. स्थानिक प्रशासन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेईल. इंटरनेट पूर्ववत करताना शेजारी देशाच्या कारवाया देखील लक्षात घेणे गरजेचे असल्याच ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :