fbpx

योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात योग दिवस उत्साहात साजरा केला जातो आहे. गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. आणि परिणामी गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने झारखंडच्या रांचीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदींनी ४० हजार लोकांसोबत योग केला.

यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला निरोगी बनविण्यासाठी योग फार महत्वाचा आहे. आपल्याला योग अभियानाला वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे आहे. योग आपल्या देशात पहिल्यापासून आहे. आपल्या संस्कृतीचा हिस्सा आहे, असे ते म्हणाले.

योगामध्ये आजारांचा सामना करण्यासोबत पुरातन भारतीय संस्कृतीची ओळख आहे. योगामध्ये शिस्त आणि स्वयंपूर्णता आहे. याचे पालन आयुष्यभर करायचे आहे. योगा धर्म, जात, पंथाच्या पलीकडे आहे. योग, आज युवापिढी योगा करताना मला आनंद होतो, असेही ते म्हणाले.