देशभरात योगादिन जोरात; पंतप्रधानांसह मुख्यमंत्री अनेकांचा सहभाग

टीम महाराष्ट्र देशा: जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देहरादूनमध्ये योग केला. उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. के. के. पॉल, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, केंद्रीय आयुष मंत्री हरक सिंह रावत यांच्यासह 55 हजार लोकांनी योगासने केली.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत योग शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, बाबूल सुप्रियो सहभागी झाले होते.

तर आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांनी योग केला.