‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कंपन्यांची औरंगाबादमध्ये गुंतवणूक- बलदेव सिंह

Baldev Singh

औरंगाबाद :  पर्यावरणपूरक आणि शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने नेहमीच पुढाकार घेतला असून उपयुक्त आणि लोकाभिमूख प्रकल्पाच्या माध्यमातून ‘गो ग्रीन’ प्रकल्प शासन राबवित आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास हा आता पर्यावरणपूरक पध्दतीने होत असून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून शाश्वत विकास पूरक उद्योग उभारले जात असल्याचे उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव बलदेव सिंह यांनी म्हटले आहे. शहरात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

बलदेव सिंह म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनी महाराष्ट्रात आणि औरंगाबादमध्ये गुंतवणूक केली आहे. औरंगाबादच्या औद्योगिक विकासामध्ये ऑरिक सिटी, डीएमआयसी तसेच महाराष्ट्र औद्योगिकविकास महामंडळ याच्या माध्यमातून शासन विविध सुविधा उद्योजकांना गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. यामुळे उद्योजक देखील गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत.

ऑरिक सिटी, डीएमआयसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औरंगाबाद उद्योगात ईको फ्रेंडली, गो-ग्रीन तसेच स्मार्ट सिटीच्या उपक्रमातून उद्योगा बरोबरच पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम उद्योग विभाग करत असल्याचे प्रतिपादन बलदेव सिंह यांनी केले. यातून औरंगाबादला उद्योग वाढीसाठी मदत मिळेल, असा विश्वाासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या