इच्छा असूनही बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेणे मुश्कील- माधवी गोनबरे

मुंबई : आपल्या जिद्दीच्या जोरावर बॉक्सिंग या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे इच्छा असूनही स्पर्धेत भाग घेणे मुश्कील होते, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू माधवी गोनबरे हिने व्यक्त केली आहे. अंधेरीमधील संघर्ष नगर येथे सभेत ती बोलत होती.

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोलीचे अध्यक्ष शरद भावे यांनी आर्थिक मदत केल्यामुळे काही दिवसापूर्वी आंतराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले. यासाठी त्यांची मी आजन्म ऋणी राहीन असे भावनिक उद्गार माधवीने काढले.