गुजरात भाजपमध्ये अंतर्गत कलह; मंत्र्यांचा शपथविधी ढकलला पुढे

bhupendra patel

सुरत : माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदावर घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची वर्णी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर लागली आहे. दरम्यान आता गुजरातमध्ये अचानक मुख्यमंत्री बदलल्याने भाजपामध्ये आधीच खळबळ उडालेली असताना आजचा नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमडळाचा शपथविधी सोहळा काही तासांसाठी पुढे ढकलावा लागला आहे.

यामुळे गुजरात भाजपात सारेकाही आलबेन नसल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ निवडीवरून मोठा वाद सुरु झाला आहे. गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. यामध्ये भाजपाने भल्या भल्यांचे पत्ते कापत भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र, कॅबिनेटचा पहिल्या टप्प्यातील थपथविधी आज दुपारी होणार होता. परंतू मंत्री पदांवरून भाजपात नाराजांनी विरोध केल्याने हा शपथविधी सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या