गतिमान वैरण विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : राकृवियो अंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम असे या योजनेचे नाव आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना असे या योजनेचा प्रकार आहे. या योजनेमध्ये केंद्र व राज्याचा 60 : 40 टक्के हिस्सा आहे. योजनेसाठी चालु वर्षाची तरतुद (2016-17) 2500.00(रक्कम रु.लाखात) आहे.

योजनेमध्ये चारा पिकाचे बियाणे परमीटवर लाभाथ्र्यास उपलब्ध करुन दिले जाते असे अनुदान देण्याची पध्दत आहे. रु.1500 प्रती हेक्टरच्या मर्यादेत चारा पिकाच्या लागवडीसाठी बियाणे देण्यात येते अशी अनुदानाची मर्यादा आहे. आपतकालीन परिस्थितीत हिरवा चारा उपलब्धतेच्या दृष्टीने राबविण्यात येण्यासाठी असा या योजनेचा उद्देश झाहे. अनुसुचित जाती/जमाती, महिला शेतकरी तसेच सर्वसाधारण गटातील शेतकरी या प्रवर्गासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

स्वत:ची शेत जमिन व पशुधन असणे आवश्यक आहे, अशी या योजनेसाठी अटी आवश्यक आहे. रु.1500 प्रती हेक्टरच्या मर्यादेत चारा पिकाच्या लागवडीसाठी बियाणे देण्यात येणार आहे असे दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप आहे. लाभार्थीची लाभ उपलब्ध करुन देण्याच्या प्रक्रियेला लागणारा अंदाजित कालवधी 3 ते 4 आठवडे असणार आहे. संबधित मंडळ कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी असे संपर्क कार्यलयाचे नाव व पत्ता आहे.