विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा समोर

बीड: भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा दिसून आले. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सदस्यांनी समाजकल्याण विभागांतर्गत विविध विकास कामांच्या निधीच्या वाटपा संदर्भात मतदान घ्या, असा ठराव मांडला. याला सत्तेत असलेल्या शिवसंग्रामच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले त्यामुळे. पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील भाजप-शिवसंग्राम आमने सामने आले.

पंकजा मुंडे आणि महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे आमदार मेटे यांच्यातील राजकीय वाद आता सर्वश्रृत झाला आहे. याआधी पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाला मेटे नसतात. तर विनायक मेटेंच्या कार्यक्रमाला मुंडे नसतात. सभागृहात समाजकल्याण विभागांतर्गत विविध विकास कामांना मंजूर असलेल्या त्या २७ कोटी ७५ लाख ३३ हजार निधीच्या वाटपा संदर्भात शिवसंग्रामच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात मतदान दिले.

समाजकल्याण विभागाच्या त्या २७ कोटीच्या निधी वाटपावरून गोंधळ झाला. बीड जिल्हा परिषदेच्या आगामी वर्षाकरिता अर्थसंकल्पावर सर्वसाधारण सभा झाली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा परीषद सदस्य बजरंग सोनवणे यांनी निधी वाटपा बाबत मतदान घेण्यात यावे, असा ठराव सभागृहात मांडला होता. भाजप-२९ व काँग्रेस, शिवसंग्राम- १८ असे ठरावावर मतदान झाले.

जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी भाजप व शिवसंग्राम एकत्रीत होते. मात्र आता निधी वाटपांवरून त्यांच्यात मतभेद असल्याचे वास्तव चित्र मंगळवारी बजेट मिटींग दरम्यान पहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वीच मेटे समर्थकांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भाजपा कडून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती.