‘राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळा ढवळ ; राज्यात सत्तेची दोन केंद्र करण्याचा प्रयत्न’

uddhav

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळ थंडावलेला राज्यपाल विरोध ठाकरे सरकार हा वाद पुन्हा एका पेटला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळा ढवळ सुरु आहे. तसेच राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू त्यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

सध्या राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

हिंगोलीत विद्यापीठ नसतानाही राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. तसेच परभणीत दोन तास प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज्याचे मुख्यसचिव राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना त्याबाबतच्या सूचना देतील, असं त्यांनी सांगितलं.

त्याचसोबत राज्यपाल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांना अधिकार आहेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा कशाला घेत आहेत? राज्य सरकारचे जे अधिकार आहेत त्याचे हनन करण्याचं काम राज्यपालांकडून होत आहे. नांदेड, परभणी याभागात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दौरा आहे. मी मुख्यमंत्री असताना मी असं केलं, तसं केले, ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मात्र आता ते राज्यपाल आहेत हे त्यांना अवगत केले जाईल. लोकशाहीत सर्व अधिकार संसदेला, विधानभवनाला असतो. राज्यपालांकडून ज्या चूका झाल्यात त्या दुरुस्त करतील अशी अपेक्षा आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या