fbpx

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या होणार आता फक्त एका क्लिक वर

अक्षय पोकळे:- शिक्षण खात्यातील आंतरजिल्हा होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यात होणारा लाखो रूपयांचा फोफावत चालेला भ्रष्टाचाराला आता आळा बसणार आहे. संगणकीकृत आंतर जिल्हा शिक्षक बदली (ऑन लाईन इंटर डीस्ट्रीक्ट ट्रान्सफरऑफ ZP टीचर्स) ही प्रक्रिया या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासुन राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करणाऱ्या शिक्षाकांना आपल्या कुटुंबाजवळ येणे आता शक्य झाले आहे आणि तेही फक्त एका क्लिक वर.

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या व अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणीत सापडलेल्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आंतर जिल्हा शिक्षक बदली  ही प्रक्रिया राबवन्यात येत आहे. या आधी एका वर्षाला फक्त ५०० ते ६०० शिक्षकांच्या बदल्या होत मात्र हेच काम ऑनलाइन पद्धतीने केल्यावर ५४०० शिक्षकांच्या बदल्या आतापर्यंत झाल्या आहेत तसेच  १५००० पेक्षा जास्त बदल्या प्रतीक्षेत आहेत.

कोणते फायदे होणार आहेत:-

पारदर्शक, विना वशिला, भ्रष्टाचार मुक्त, सर्वाना समान न्याय मिळणार आहे

वेळेची बचत1होणार आहे व शिक्षणाची गुणवत्ताही वाढणार  आहे

एका फॉर्म वर ही बदली प्रकिया आहे त्यामुळे होणारा नाहक त्रास कमी होणार आहे

शिक्षकाना त्यांच्या कुटुंबा सोबत राहता येईल.

या प्रक्रिये साठी खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता जिल्हा परिषदेची बिंदू नामावली पूर्ण नसल्यामुळे बदल्या होत नव्हत्या त्यावर मात म्हणून संपूर्ण राज्यात बिंदू नामावली पूर्ण करून संगणकीकृत बदली प्रक्रिया राबविण्यातआली ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त, सर्वाना समान न्याय देणारी आहे. यामुळे हजारो कुटुंब एकत्र आली.परजिल्ह्यात जाऊन नोकरी करावी लागत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत होता. शिक्षकाला मानसिक दडपणाखाली राहवे लागत होते याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर होत होता परंतु सदर प्रक्रियेमुळे शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यात जाता आले आहे.

:- नितीन व्हटकर
(प्रकल्पाचे अभ्यासक तंत्रस्नेही शिक्षक)